वारी पाहण्याचा , लिहीण्याचा विषय नाही . वारी अनुभवण्याचा विषय आहे . मुळात हा विषयच नसून एक अलौकिक अनुभूती आहे . काही महिन्याच्या बाळापासून ते वयाची नव्वदी अोलांडलेली सारी माणसं ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात एकरुप होऊन जातात . जात , पंथ , धर्माचे सारे भेद इथं गळून पडतात . इथल्या वाटेवर कोणीही कोणाला नावाने हाक मारत नाही . जोपर्यंत वारीच्या वाटेवर आहात तोपर्यंत तुमचं नाव केवळ ‘ माऊली ‘ आहे . इथं प्रत्येकजण एकमेकांना माऊली नावाने हाका मारतो . अोळखपत्र लागत नाही . चेहर्यावर विलसत असलेलं माऊलींच्या नामाचं हास्यच इथली अोळख !
माऊलींच्या आधी इथं ‘ एक गुरु – एक शिष्य ‘ परंपरा होती . गुरुने आपलं ज्ञान केवळ एकाच शिष्याला अाणि त्याने केवळ त्याच्याच शिष्याला द्यायचं . ही परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली . नाथांनी ज्ञानेश्वरांना ते ज्ञान सांगितलं . आणि ज्ञानोबांनी मात्र ; ते सार्या जगासोबत वाटलं . वारकरी सांप्रदायाचा पाया रचला . भेदाभेद महापाप मानलं . म्हणून माऊलींचा मान सार्या संतांमध्ये अधिक . माऊलींनी रचलेल्या ज्ञान आणि प्रेमाच्या मंदीराला तुकोबांनी कळस चढविला . म्हणून ज्ञानोबा – तुकाराम चा गजर होतो ह्या वाटेवर …
कोणाला आमंत्रण दिल्या जात नाही . भर पावसातही एखाद्या तरुण रक्ताला लाजवेल अशी पाऊलं खेळतात ही वृद्ध माणसं . कुठून येत असेल हे तेज ? हे तेज आहे भक्तीचं अाणि श्रद्धेचं . ईश्वर म्हटलं की , केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहणार्या लोकांनी ह्या वृद्धांसोबत व्यतीत करावा काही काळ वारीच्या वाटेवर . आनंद म्हणजे काय ? भक्ती म्हणजे काय ? ह्या सार्यांची उत्तर मिळत जातील . वारी ही आपल्या आत होणारं परिवर्तन आहे . पंढरीसे जारे आल्यानो संसारा ॥ असं संत सांगतात त्यामागचं कारण भव्य आहे . हा काही दिवसांचा प्रवास सांगतो आपल्या आत्म्याला की , आहे ! आहे अजूनही ह्या विश्वात प्रेम , स्नेह , आपुलकी , दया आणि कैवल्य , साहस आणि विश्वास .. ह्या सार्या भावना वारीत प्रत्यक्ष कोणा न कोणाच्या रुपाने वावरतात . .
ह्यावर्षी वारीची वाट सुनीसुनी राहणार . काल जगद्गुरू तुकोबांचं प्रस्थान झालं . आज विश्वमाऊली ज्ञानोबांच प्रस्थान . मोजक्याच काही संताच्या पालखी ह्यावेळेस पंढरपुरात दाखल होतील . बा विठ्ठला ! लढण्यास बळ दे फक्त ..
स्वत:शी अोळख करुन घेण्यासाठी , वारीसारखा प्रवास दुसरा कोणता नाही .
———— हे ही वाचा ———–
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध केमिस्ट्री शिक्षक… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरूपुणे/नागपूर, १७ मे २०२६ (महाराष्ट्र व्हॉइस): भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) ने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal)… Read more: बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
