वारी पाहण्याचा , लिहीण्याचा विषय नाही . वारी अनुभवण्याचा विषय आहे . मुळात हा विषयच नसून एक अलौकिक अनुभूती आहे . काही महिन्याच्या बाळापासून ते वयाची नव्वदी अोलांडलेली सारी माणसं ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात एकरुप होऊन जातात . जात , पंथ , धर्माचे सारे भेद इथं गळून पडतात . इथल्या वाटेवर कोणीही कोणाला नावाने हाक मारत नाही . जोपर्यंत वारीच्या वाटेवर आहात तोपर्यंत तुमचं नाव केवळ ‘ माऊली ‘ आहे . इथं प्रत्येकजण एकमेकांना माऊली नावाने हाका मारतो . अोळखपत्र लागत नाही . चेहर्यावर विलसत असलेलं माऊलींच्या नामाचं हास्यच इथली अोळख !
माऊलींच्या आधी इथं ‘ एक गुरु – एक शिष्य ‘ परंपरा होती . गुरुने आपलं ज्ञान केवळ एकाच शिष्याला अाणि त्याने केवळ त्याच्याच शिष्याला द्यायचं . ही परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली . नाथांनी ज्ञानेश्वरांना ते ज्ञान सांगितलं . आणि ज्ञानोबांनी मात्र ; ते सार्या जगासोबत वाटलं . वारकरी सांप्रदायाचा पाया रचला . भेदाभेद महापाप मानलं . म्हणून माऊलींचा मान सार्या संतांमध्ये अधिक . माऊलींनी रचलेल्या ज्ञान आणि प्रेमाच्या मंदीराला तुकोबांनी कळस चढविला . म्हणून ज्ञानोबा – तुकाराम चा गजर होतो ह्या वाटेवर …
कोणाला आमंत्रण दिल्या जात नाही . भर पावसातही एखाद्या तरुण रक्ताला लाजवेल अशी पाऊलं खेळतात ही वृद्ध माणसं . कुठून येत असेल हे तेज ? हे तेज आहे भक्तीचं अाणि श्रद्धेचं . ईश्वर म्हटलं की , केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहणार्या लोकांनी ह्या वृद्धांसोबत व्यतीत करावा काही काळ वारीच्या वाटेवर . आनंद म्हणजे काय ? भक्ती म्हणजे काय ? ह्या सार्यांची उत्तर मिळत जातील . वारी ही आपल्या आत होणारं परिवर्तन आहे . पंढरीसे जारे आल्यानो संसारा ॥ असं संत सांगतात त्यामागचं कारण भव्य आहे . हा काही दिवसांचा प्रवास सांगतो आपल्या आत्म्याला की , आहे ! आहे अजूनही ह्या विश्वात प्रेम , स्नेह , आपुलकी , दया आणि कैवल्य , साहस आणि विश्वास .. ह्या सार्या भावना वारीत प्रत्यक्ष कोणा न कोणाच्या रुपाने वावरतात . .
ह्यावर्षी वारीची वाट सुनीसुनी राहणार . काल जगद्गुरू तुकोबांचं प्रस्थान झालं . आज विश्वमाऊली ज्ञानोबांच प्रस्थान . मोजक्याच काही संताच्या पालखी ह्यावेळेस पंढरपुरात दाखल होतील . बा विठ्ठला ! लढण्यास बळ दे फक्त ..
स्वत:शी अोळख करुन घेण्यासाठी , वारीसारखा प्रवास दुसरा कोणता नाही .
———— हे ही वाचा ———–
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहेWho is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. अनेक … Read more
- Pahalgam terrorist attack | जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यात 26 पर्याटक ठार, महाराष्ट्रातील सहा जण – वाचा सविस्तरजम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ नागरिक, ज्यात बहुतेक पर्यटक होते, ठार … Read more
- क्रिकेट क्षेत्रात खळबळ; लिंग परिवर्तन केलेला आर्यन किंवा अनाया बांगर पुन्हा चर्चेत, लालनटॉप दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोपअनाया बांगरने अलीकडेच भारतीय पुरुष क्रिकेट परिसंस्था स्त्रीमध्ये रूपांतरित होण्याच्या काळात अप्रिय आणि प्रतिकूल असल्याचा दावा करून प्रसिद्धीझोतात … Read more
- प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची प्रशासनातील लुडबुड, सिईओ यांना खटकली ?जालना जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शालार्थ समन्वयक म्हणून काम करत असलेल्या चंद्रकांत पौळ या … Read more
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?बुधवारी वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता संसदेत आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात उपस्थित … Read more