बाबरी मस्जिद पडून अनेक वर्षे झाली मात्र तरीही यावर आजही अनेक खुलासे नेतेमंडळींकडून केले जात आहे. यातच भाजपच्या एका मंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे . बाबरी मस्जिद पडली तेव्हा अयोध्येत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक यापैकी कोणीही नव्हते असा खळबळजनक दावा भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या दाव्यानंतर आता यावर ठाकरे गटाकडून काय उत्तर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Balasaheb and Shiv Sainik were not in Ayodhya at the time Babri was destroyed – Chandrakant Patil
2019 ची निवडणूक व त्यांनतर राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार यामुळे शिवसेना व भाजपात दुरावा निर्माण झाला. यानंतर दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे करत असतात. यातच आता भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. Balasaheb and Shiv Sainik were not in Ayodhya at the time Babri was destroyed – Chandrakant Patil
नेमकं काय म्हणाले पाटील?
बाबरी मस्जिद पडली तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब हे स्वतः तिथे गेले होते का शिवसैनिक तिथे गेले होते? का बजरंग दल तिथे होते. कारसेवक कोण होते ? याबाबतीत जास्त खोलात जाण्याची गरज नाही कारण जे कारसेवक तिथे होते ते हिंदू होते. कारसेवक व बजरंगदल हे दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण पण तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं नाही. कारण शेवटचा माणूस त्याठिकाणहून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं.
अशा वातावरणात आम्ही काम केलेले आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणून तुम्ही काय 4 सरदार तिथे पाठवले होते का?” असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वातावरण चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.