मुंबई: महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील. (Maharashtra HSC Result 2021 Formula declared by Government SSC FYJC and HSC internal evaluation consider for final Result)
इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश
इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण
इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश
बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.
बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द
सन 2020-21 या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.
हे ही लेख वाचा ——————-
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरूपुणे/नागपूर, १७ मे २०२६ (महाराष्ट्र व्हॉइस): भारत मौसम विज्ञान विभाग… Read more: बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
- NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यातनवी दिल्ली/पुणे, १७ मे २०२६: देशभरातील MBBS, BDS सारख्या वैद्यकीय… Read more: NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
