पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला असून, देशात ३६ वा क्रमांक प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यात पहिली आली आहे. तर नगरचा विनायक नरवाडेने देशात ३७ वा क्रमांक पटकावीत राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या मुख्य परीक्षेचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला आहे. ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निकालात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवारांनी युपीएससीत यश मिळविल्याचे दिसत आहे. पूजा कदम (५७७) आणि आनंद पाटील (३२५) यांनी दृष्टीदोशावर मात करत युपीएससीत यश प्राप्त केले आहे. Great success of students from Maharashtra in UPSC examination, success of 100 out of 761 Marathi students
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात 199 वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर पूजा कदम या विद्यार्थीनीने अंधत्वावर मात करत युपीएससीत यश मिळवले आहे. (Success of Marathi students in UPSC exams, Nitisha Jagtap won in her first attempt in just 21 years) Great success of students from Maharashtra in UPSC examination, success of 90 out of 761 Marathi students
महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे नितीशा जगताप (१९९), प्रवीण दराडे (३१२) , आकाश चौधरी (३२२), आनंद पाटील (३२५), सचिन चौबे (३३४), श्रीकांत विसपुते (३३५), दिव्या गुंडे (३३८), सुहास गाडे (३५०), सागर मिसाळ (३५३), सुरज गुंजाळ (५५४), अनिल मस्के (३६१), अर्पिता ठुबे (३८३), सागर वाडी (३८५), आदित्य जिवने (३९९), गोगणा गावित (४२२), अनिकेत फडतरे (४२६), श्रीराज वाणी (४३०), राकेश अकोलकर (४३२), वैभव बांगर (४४२), शुभम जाधव (४४५), अमर राऊत (४४९), शुभम नागरगोजे (४५३), ओंकार पवार (४५५), अभिषेक दुधाळ (४६९), प्रणव ठाकरे (४७६), श्रीकांत मोडक (४९९), यशवंत मुंडे (५०२), अनुजा मुसळे (५११), बानकेश पवार (५१६), अनिकेत कुलकर्णी (५१७), अश्विन राठोड (५२०),अर्जित महाजन (५२१), शुभम स्वामी (५२३), श्रीकांत कुलकर्णी (५२५), शरण कांबळे (५४२), स्नेहल ढोके (५६४), सचिन लांडे (५६६), स्वप्निल चौधरी (५७२), अभिषेक गोस्वामी (५७४), अनिल कोटे (५८४), विकास पालवे (५८७), विशाल सारस्वत (५९२), हर्षल घोगरे (६१४), अजिंक्य विद्यागार (६१७), निलेश गायकवाड (६२९), हेतल पगारे (६३०), रविराज वडक (६३३), कुणाल श्रोते (६४०), सायली गायकवाड (६४१), सुलेखा जगरवार (६४६), सुबोध मानकर (६४८), शिवहार मोरे (६४९), सुब्रह्मण्य केळकर (६५३), सुमितकुमार धोत्रे (६६०), किरण चव्हाण (६८०), सुदर्शन सोनवणे (६९१), विनीत बनसोड (६९२), श्लोक वाईकर (६९९), अजय डोके (७०५), देवव्रत मेश्राम (७१३), स्वप्निल निसर्गन (७१४), शुभम भैसारे (७२७), पियुष मडके (७३२), शितल भगत (७४३), स्वरूप दीक्षित (७४९) Great success of students from Maharashtra in UPSC examination, success of 100 out of 761 Marathi students
एक नजर निकालावर
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 761 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –263, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 86, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 229, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 122, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 61 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 25 शारीरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 150 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 75, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)-14, इतर मागास वर्ग -55, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती – ०1 उमेदवारांचा समावेश आहे.
या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –49, अनुसूचित जाती (एस.सी.) – २8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 36 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 03, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80, उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 30, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 15 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 302 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 118 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 34, इतर मागास प्रवर्गातून – 84, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 43 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –23 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 118 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -53, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 11 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 31, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 16 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. 151 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे.
======================================================================================
- राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?
- भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposed
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का ? जीवन परिचय |Devendra Fadnavis Biography
- शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.