चांद्रयान-३ चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश; पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , अप्रतिम दृश्य तुम्हीही पहा

भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३’ने अवकाशात झेप घेतली होती. त्यानंतर आता २२ दिवसांनी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.चांद्रयान-३ मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. चांद्रयानाला चंद्राच्या कक्षेत अलगदपणे पोहोचवणं अगदी अवघड काम होतं. यामध्ये छोटीशी जरी चूक झाली असती, तरी चांद्रयान चंद्रावर क्रॅश झालं असतं. मात्र, सुदैवाने असं काही घडलं नाही. Chandrayaan-3 enters lunar gravitational orbit; The first VIDEO of the moon has been sent, you should also watch the amazing view

चांद्रयान-३ ने यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून, यान अगदी सुस्थितित असल्याचं इस्रोने ट्विट करून सांगितलं आहे.यानंतर आता चांद्रयान-३ हे चंद्राभोवती एक फेरी मारेल. उद्या (6 ऑगस्ट) रात्री ११ वाजेच्या सुमारास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात येईल. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी तिसऱ्या, १४ ऑगस्टला चौथ्या आणि १६ ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल. (ISRO Chandrayaan-3)

चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. अंतराळयानात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे चित्र रेकॉर्ड करण्यात आले. चांद्रयान 3 शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यादरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये चमकदार चंद्र दिसू शकतो. व्हिडीओमध्ये स्पेसक्राफ्टमध्ये बसवलेले सोलर पॅनल्सही दिसत आहेत. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली आहे. Chandrayaan-3 enters lunar gravitational orbit; The first VIDEO of the moon has been sent, you should also watch the amazing view

https://twitter.com/chandrayaan_3/status/1688215948531015681?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1688215948531015681%7Ctwgr%5E846f9c6d69bc7f36d2c0ab48343413f771bc838f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fisro-shared-photos-captured-from-chandrayan-3-mcb98

चांद्रयान-3 मिशन 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर यान पृथ्वीच्या पाच फेऱ्या घेऊन चंद्राकडे रवाना झाले. चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश (LOI) पूर्ण केल्यामुळे शनिवार हा मोहिमेसाठी महत्त्वाचा दिवस होता. इस्रोने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्ट दिसतं आहे. चांद्रयान-३ ही भारताची चंद्राच्या अध्ययानासाठी पाठवलेली तिसरी मोहीम होती. याआधी पाठवलेल्या पहिल्या मोहीमेत भारताला यश आलं होतं, तर दुसऱ्या चांद्रयान मोहीमेच अंतिम टप्प्यात विक्रम लॅंडरचा अपघात झाल्याने ही मोहीम अंशत: अपयशी झाली होती. Chandrayaan-3 enters lunar gravitational orbit; The first VIDEO of the moon has been sent, you should also watch the amazing view

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice