जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या सुधारित शासन निर्णय 18 जूनला राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. या सुधारित शासन निर्णयात जुन्या आदेशात फारसे धोरणात्मक बदल केलेले नसले तरी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या काही नियमात सुस्पष्टता आली आहे. तसेच यापुढे गुरुजींच्या बदल्या ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन करण्याबाबत धोरण अंतिम करण्यात आले आहे. यामुळे आता बदलीसाठी शिक्षकांना जिल्हा परिषदेचे उंबरे झिजवण्याची वेळ येणार नाही. Zilla Parishad Revised Government Decisions on Transfers of Primary Teachers
मागील आठवड्यात ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशात पूर्वीच्या 21 जून 2023 शासन निर्णयात फारसे धोरणात्मक बदल करण्यात आलेली नाहीत. मात्र, आता शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या या ऑनलाईनच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य पातळीवर शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीसाठी एक नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार असून जिल्हा पातळीवर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी नेमण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा पातळीवर होणार्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सहभागी होणार्या शिक्षकांचा बदलीसाठी पसंतीक्रमांक आता थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिसणार आहे. Zilla Parishad Revised Government Decisions on Transfers of Primary Teachers
विशेष संवर्ग बदली भाग दोनमध्ये पात्र असणारे पती आणि पत्नी यांची जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया करतांना दोघे एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या सीमा रेषेवर कार्यरत असणार्या अन्य जिल्ह्यातील तालुक्यातील गावात कार्यरत पती-पत्नी शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याबाबत शासनाच्या आदेशात स्पष्ट सुचना नव्हत्या. मात्र, आता याबाबत सुधारित आदेशा स्पष्टता करण्यात आलेली असल्याने विशेष संवर्ग भाग दोनमधील दोघेही शिक्षक एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. Zilla Parishad Revised Government Decisions on Transfers of Primary Teachers
या बातम्या वाचल्या का?
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर