Mumbai Goa Cruise Rave Party NCB Zonal Director Sameer Wankhede detain Bollywood Actor Shah Rukh Khan Son Aryan know who is Sameer Wankhede news in marathi
समीर वानखेडे यांचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. आता त्या हयात नाहीत. पण समीर यांनी धर्मांतर केलं नाही. आम्ही सर्व धर्मीयांचा आदर करतो, त्यानंतर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही वेगाने व्हायरल झाला. त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी सोबतचा हा फोटो होता.
त्यानंतर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही वेगाने व्हायरल झाला. त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी सोबतचा हा फोटो होता. वानखेडे यांचा पहिला विवाह झाला होता आणि एका मुस्लिम तरुणीसोबत त्यांचा विवाह झाला होता, असं या फोटोतून कुणाला तरी सूचवायचं होतं. त्यातच मलिक यांनी ‘समीर दाऊद वानखेडे’ असं ट्विटमध्ये म्हटल्याने तर्कवितर्क लढवले गेले. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचा दुसरी पत्नी क्रांती रेडकरसोबतचाही फोटो व्हायरल झाला.
Sameer Wankhede|काही दिवसांपासून समीर वानखेडे हे नाव खूप चर्चेत आहे. खासकरुन मुंबईमधील काही काळापासून सुरु असलेल्या ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरु झाल्यापासून समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आलं. समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयात झोनल डायरेक्टर आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. सध्या त्यांनी सुरु केलेल्या कारवायाच्या धडाक्यामुळं समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत.
कोण आहेत समीर वानखेडे? Who is Sameer Wankhede?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. मीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
कोणकोणत्या पदांवर काम
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली
2013 मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.
एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे, याचे कारण समीर वानखेडे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जी सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करत आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समीर वानखेडे एका मराठी अभिनेत्रीचे पती आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक सिनेमात झळकली आहे.
क्रूझ मुंबईच्या दिशेने वळवली
पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कपड्यांमधून ड्रग्ज आणले
पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
===================================================================================
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet