प्रेमभंगातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

प्रेमभंगातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

The lover killed his girlfriend out of love

नांदेड, दि. २४ (प्रतिनिधी)-प्रेमभंग झाल्याने एका युवकाने युवतीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना आज दि.२४ ऑक्टोबर रोजी शहरातील शारदानगर येथे घडली. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळाजवळून ताब्यात घेतले आहे. The lover killed his girlfriend out of love

शहरातील शारदानगर परिसरातील झेंडा चौक येथे अ‍ॅड.दिगंबर माणिक हारदळकर यांच्या घरी गौर कुटुंब किरायाने राहत होते. याच कुटुंबातील कु.वैष्णवी संजय गौर हिचे व पांगरी येथील सुरेश देविदास शेंडगे यांचे मागील दोन ते चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतू प्रेमभंग झाल्याने आज दि.२४ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सुरेश देविदास शेंडगे हा वैष्णवी गौर हिच्या घरी आला. यावेळी वैष्णवीचे वडील संजय गौर हे नौकरीवर तर आई बाहेरगावी गेली असल्याने सुरेश शेंडगे व वैष्णवी गौर यांच्यात वाद होवून सुरेश शेंडगेने वैष्णवीची गळा चिरुन हत्या केली.

खून झाल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे, सहायक पोलीस निरीक्षक गिते, गुन्हे शोध पथकाचे भारत राठोड, बाबा गजभारे, महिला पोलीस कर्मचारी गजभारे व शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. The lover killed his girlfriend out of love

यावेळी घटनास्थळाच्या जवळ आरोपी सुरेश शेंडगे हा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी सुरेश शेंडगे यास अटक केली आहे तर मयत वैष्णवी गौर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. The lover killed his girlfriend out of love

<

Related posts

Leave a Comment