IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध

IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध

मुंबई : माहिती आणि तंत्रद्यान क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. दरवर्षी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून लाखो इंजिनियर बाहेर पडतात. लाखो रुपयांचे पॅकेज सहज  उपलब्ध होणे हे आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्य होय. याच आयटी क्षेत्राला मध्यंतरी मंदीमुळे झटका बसला होता. तरीही माहिती तंत्रद्यान क्षेत्राने पुन्हा उफाळी घेतली.

कोरोनाकाळात पण माहिती तंत्रद्यान (आयटी) क्षेत्र तग धरून होत. याच आयटी क्षेत्रात आता येत्या दोन वर्षात लाखो रोजगार उलब्ध होणार आहेत. यात नुकतेच आयटी क्षेत्रातील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना आणि युवतींना पण संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आयटी क्षेत्रातील फ्रेशर्स पण येत्या काळात येणाऱ्या संधीच सोन करू शकणार आहेत. आता फ्रेशर्ससाठी ही IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. तब्बल 3,60,000 फ्रेशर्सना IT क्षेत्रात जॉब मिळणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या शतकाच्या सुरुवातीपासून इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्रात नोकरीच्या संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहेत. TCS, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या मोठ्या IT कंपन्यांमध्ये पण संधी उपलब्ध होणार आहेत. हे जे जवळपास ४ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत यात काही भारतीय IT कंपन्या आहेत तर काही परदेशी IT कंपन्या पण आहेत. IT क्षेत्रात कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण हे इतर क्षेत्रातील कंपन्यांपेक्षा जास्त आहे. यालाच अट्रिशन रेट (Attrition Rate ) म्हणतात हाच अट्रिशन रेट कमी करण्याचा देशातील आणि परदेशातील आयटी कंपंन्यांचा विचार आहे.

म्हणूनच भारत देशात कार्यालय असणाऱ्या अनेक IT कंपन्या २०२२-२३ या दोन वर्षात जवळपास ४ लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यात फ्रेशर्सला पण संधी उपलब्ध होऊ शकत असल्यामुळे अनेक जणांच्या रोजगाराचा प्रश्न निकाली लागणार आहे. TCS, WIPRO, INFOSYS आणि Capgemini  या प्रमुख IT कंपन्यात पण रोजगार उपलब्ध होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

<

Related posts

Leave a Comment