मुंबई, 07 फेब्रुवारी: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांच्यावर शिवाजी पार्कवर (Shivaji Park)शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यानंतर आता भाजपनं लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ही मागणी करुन यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. या पत्रात राम कदमांनी शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी केली आहे. (BJP MLA Ram Kadam raised a new controversy over Lata Mangeshkar’s memorial)
राम कदम यांनी काय लिहिलं पत्रात
राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल. यासंदर्भातील एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून स्मारक उभारण्याची भावना लतादीदींच्या सर्व चाहत्यांचीही असल्याचं कदम पत्रात म्हटलं आहे.
भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लतादीदींवर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागी शिवाजी पार्कवर गानकोकिळा लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारुन त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यावधी संगीत प्रेमी व लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहेत. तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे, असंही ते पत्रात म्हणाले आहे. (BJP MLA Ram Kadam raised a new controversy over Lata Mangeshkar’s memorial)
Maharashtra BJP MLA Ram Kadam writes to CM Uddhav Thackeray, requesting a memorial of veteran singer #LataMangeshkar, at Shivaji Park in Mumbai. She was cremated at the park yesterday with full state honours. pic.twitter.com/xkMDIVsJy7
— ANI (@ANI) February 7, 2022
BJP MLA Ram Kadam raised a new controversy over Lata Mangeshkar’s memorial
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर