जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पद्मभूषण अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पद्मभूषण अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे  आयोजन

राळेगणसिद्धी ता- पारनेर येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे सरांच्या जयंती व ०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील सर्व पर्यावरण प्रेमींना संस्थेच्या २०२३-२६ कालावधीसाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्राचे वितरण व मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणवादी पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर पद्मश्री डॉ विकास महात्मे आंतराराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत नेत्रचिकित्सक , मा.श्री अशोकराव काकडे आय ए एस व्यवस्थापकीय संचालक सारथी,मा डॉ सुधाताई कांकरिया स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक , मा. दिनकरराव टेमकर मा.शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य, मा.श्रीमती सुवर्णाताई माने भा व से उपवनसंरक्षक वन विभाग अहमदनगर ,मा.श्री सचिन कंद साहेब विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अहमदनगर ,मा.श्री राज देशमुख साहेब संस्थापक (W.E ) चांगुलपणाची चळवळ या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत एक दिवशीय कार्यशाळा आयोजित.

तसेच संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पर्यावरण चळवळ किती महत्वाची असून जागतिक तापमानवाढ़ , बिगर मोसमी पाऊस , अनियमित हवामान, त्याचे मानवी , प्राणी व वने जंगलसंपत्ती वर होणारा दुष्परिणाम त्यावर प्रभावी उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे म्हणून ही एक पर्यावरण प्रेमींसाठी आगळीवेगळी पर्वंनी असणार आहे त्याचा आवश्य लाभ सर्वानी घ्यावा , असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे सरांनी केले आहे.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सचिव श्रीमती वनश्रीताई मोरे, सचिव (कार्यक्रम व नियोजन )श्री अनिल लोखंडे सर ,कार्याध्यक्ष श्री प्रमोद काकडे सर , मुख्याध्यापक श्री सुभाष वाखारे , उपाध्यक्ष सुभाष धुमाळ, प्रकाश केदारी , जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, राज्य संपर्क प्रमुख श्री विजय बोडखे ,श्री सुभाष कोंडेकर , राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी श्री उत्तम पवार ,कार्याध्यक्ष श्रीमती छायाताई राजपूत , श्री पोपटराव पवार, श्री दिलीपराव धावणे पाटील प्रा अमोल चंदनशिवे, जिल्हाध्यक्षा श्रीमती लतिका पवार , सौ रजनीताई गोंदकर आदी सदस्य व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सर्व पर्यावरण प्रेमिंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.

<

Related posts

Leave a Comment