मुंबई, दि.१६ : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवून ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबविण्याचे विभागाने नियोजन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले. Implement ‘Food Security Week’ through Food and Drug Administration Department – Minister Dr. Rajendra Shingane
मंत्रालयातील दालनात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या जनजागृतीबाबतच्या नियोजनासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त परिमल सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) गणेश रामदासी यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Implement ‘Food Security Week’ through Food and Drug Administration Department – Minister Dr. Rajendra Shingane
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, औषधे खरेदी करताना, हाताळताना व प्रत्यक्ष वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत सर्वसाधारण माहिती ग्राहकांना उपलब्ध झाली पाहिजे. सध्या सणांचा कालावधी आहे अशावेळी अन्न भेसळीच्या घटना घडू शकतात. अन्नभेसळ कशी ओळखावी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या योजना यांची रेल्वे स्टेशन नजिकचा परिसर, खाऊ गल्ली, भाजीपाला व फळबाजार आदी विविध ठिकाणी जनजागृती होणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर भर देवून प्रचार व प्रसिद्धीचे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया व सर्व माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा व मानके कायदा व विभागाची माहिती, उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. Implement ‘Food Security Week’ through Food and Drug Administration Department – Minister Dr. Rajendra Shingane
=======================================================================================
- खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडली
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवार
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटक