महिलेच्या क्रुर हत्याने महाराष्ट्र हादरला लिव्ह इन पार्टनर चे तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवलं मांस ! मिक्सरमध्ये बारीक करून तुकड्यांची लावली विल्हेवाट

महिलेच्या क्रुर हत्याने महाराष्ट्र हादरला लिव्ह इन पार्टनर चे  तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवलं मांस ! मिक्सरमध्ये बारीक करून तुकड्यांची लावली विल्हेवाट

मुंबई, दि. ८ – महिलेचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केल्याची खळबळजनक घटना मुंबई जवळील मीरा रोड नयानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकाशदीप बिल्डिंगमध्ये समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इलेक्ट्रिक करवतीने महिलेच्या शरीराचे तुकडे करून नंतर कुकरमध्ये ते मासाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावली. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून पोलिसांना बोलावले व त्यानंतर या निर्घृण खूनाचा उलगडा झाला. मृत महिला आणि आरोपी हे लिव्ह इन मध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. खूनाचे कारण अद्याप कळले नसून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत.

सरस्वती वैद्य असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मनोज साने याच्यावर मीरा-भाईदर जिल्ह्यातील नयानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता १६ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक राहुल बाळासाहेब भागतव (नयानगर पोलीस ठाणे) यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, सुमारे 19.00 वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे व प्रशा) जिलानी सय्यद यांना कळविले की, गितानगर फेज 7 मधील गिता आकाशदिप जे विंग 7 व्या माळयावरील फलट नं. 704 मधून दुर्गंधी येत आहे तरी तुम्ही जाऊन काय प्रकार आहे ते पहा. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक राहुल बाळासाहेब भागतव सोबत पो.नि. जिलानी सय्यद खाजगी वाहनाने सदर ठिकाणी पोहचले.

तेथे गिता आकाशदीप बिल्डींग जे विंग बाबत वाचमन यांना विचारपुस करून 7 व्या माळ्यावर पोहचले. फलट क्रं. 704 मधुन दुर्गंधी येत होती. याच बिल्डिंगमधील रहिवासी यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, फ्लॅटमधून वास येत असल्याची खात्री केली होती. तसेच दरवाजा वाजवला असता कोणीही दरवाजा उघडला नाही. सुमारे 16.30 वाजता सदर फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती मनोज सहानी घाबरलेल्या अवस्थेत होता.

<

Related posts

Leave a Comment