आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत.
सन २०१३ मध्ये शासकीय आयटीआय संस्थेतील प्रवेशप्रक्रीया व सन २०१५ मध्ये खाजगी आयटीआय संस्थेतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे मंडळाकडुन सर्व परीक्षार्थ्यांची माहिती संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरतांना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता दहावी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता दहावीच्या परिक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता दहावी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल. प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शिकाऊ उमेदवारी योजनेतून विद्यावेतन
युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 11 हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1 लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.
- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीभारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात…
- Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचामुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला…
- महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३.…
- राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळभारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास…