शेतकऱ्याांना सल्ला | भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी आहेत हे वान फायद्याचे
Advice to farmers | Groundnut, mug, urad, maize, bajra are beneficial
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) ः महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन झालेय. पेरण्याची तयारी सुरु आहे. चांगला आणि पुरेसी ओल तयार करणारा पाऊस झाला की पेरणी करावी असा कृषीतज्ज्ञ सल्ला देत आहेत. खरिप पेरणी करण्यासाठी भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी कोणते वान चांगले आहेत याबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.
भुईमुगासाठी जमीन: मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत: एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या द्याव्यात. खरिप पेरणीसाठी एस बी-११, जे एल-२४ (फुले प्रगती), टी अे जी-२४, जे एल-२२० (फुले व्यास), जे एल-२८६ (फुले उनप), टी पी जी-४१, टी जी-२६, जे एल-५०१, फुले आर एच आर जी-६०२१, फुले उन्नती, जे एल-७७६ (फुले भारती) या वाणांची निवड करावी.
मूग व उडीदासाठी जमीन: मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्वमशागत: चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. मूगामध्ये वैभव व बी पी एम आर-१४५ हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. खरिप पेरणीसाठी उडीदाचे टी पी यू-४ व टी ए यू-१ हे वाण वापरावेत.
बाजरीसाठी पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ८ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्वमशागत करताना जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रती हेक्टरी ५ टन / १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे. खरिपासाठी संकरीत: फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती व सुधारित: धनशक्ती वानाची पेरणी करावी.
मकासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन पूर्वमशागत: एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन १० ते १ टन प्रती हेक्टरी शेणखत/ कंपोस्ट खत यांचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत/ कंपोस्ट खताची जरूरी नसते असे विद्यापीठातून सांगितले आहे.
–——हे ही वाचा——-
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) भरती २०२६ साठी अधिकृत
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे
- बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेची धक्कादायक हकालपट्टी! हिंसक भाषा आणि धमकीमुळे घराबाहेरमुंबई, ७ फेब्रुवारी २०२६: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे.
- सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ |Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.महाराष्ट्र, 31 जानेवारी 2026 — आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्वाचा व ऐतिहासिक क्षण घडला आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची
- Ajit Pawar Paas Away |विमान अपघातात महाराषट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच निधनमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी)चे नेते अजित पवार यांचा बुधवारी सकाळी मुंबईहून पुण्याच्या बारामतीकडे जाणाऱ्या छोट्या विमान अपघातात मृत्यू

