अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना

अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना

महाराष्ट्र| केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने सगळीकडेच लेटमार्क लावला. पण आता मात्र मान्सूनने वेग धरल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण, मान्सून आता सक्रिय झाला आहे. Finally the wait for monsoon is over; Enter the country with the state; Monsoon rain has occurred here, according to the official notification of the Meteorological Department

दरवर्षी राज्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण यंदा मात्र ११ जूनपासून तो लांबणीवर आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह थांबला होता. परंतु, आता मान्सूनची प्रगती सुरू झाली असून राज्यात येत्या २ दिवसांत सर्वत्र मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर पुढच्या ४ आठवड्यांमध्ये देशात सर्वत्र पाऊस होईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांमध्ये आज मान्सूनचं आगमन झालं तर पुढच्या ३-४ दिवसांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस पुढे जाण्याची परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून जोर धरेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. Finally the wait for monsoon is over; Enter the country with the state; Monsoon rain has occurred here, according to the official notification of the Meteorological Department

दरम्यान, सध्या केरळपासून मान्सूनची वाटचाल सुरू झाली होती. तो मान्सून आता कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्रातल्या विदर्भात आणि ओडिसा, छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तसेच झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही मान्सून पोहोचेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. Finally the wait for monsoon is over; Enter the country with the state; Monsoon rain has occurred here, according to the official notification of the Meteorological Department

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice