दिलासादायक महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होतोय.

दिलासादायक महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होतोय.
www.newsmaharashtravoice.com

Online Team:- (Corona Update) – गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. अनेक दिवसांनंतर राज्यातील कोरोना आकडेवारी ४० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३७ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 9 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 110448 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. (Corona Update covid19 patients rajesh tope maharashtra health ministry)

<

Related posts

Leave a Comment