महाराष्ट्रराजकारण

Maharashtra Cabinet Expansion : ‘या’आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ पहा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. यामध्ये १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिमदाची शपथ घेतली. पण आता या मंत्र्यांना कुठली खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप कधी होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. (cabinet expansion done now)

भाजपमधून या मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सुरेश खाडे (Suresh Khade), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), मंगलप्रभात लोढा

शिंदे गटातील या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

तानाजी सावंत (Tanaji Sawant), उदय सामंत (Uday Samant), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), दादा भुसे (Dada Bhuse), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), संजय राठोड (Sanjay Rathod), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

“कॅबिनेटचा विस्तार आज पार पडला. आजपासूनच हे मंत्री पूर्ण क्षमतेनं काम सुरु करतील. तसेच लवकच ते आपापल्या खात्यांचा पदभार स्विकारतील. हे छोट मंत्रिमंडळ असून उर्वरित विस्तार अद्याप बाकी आहे,” असं CM शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.

भाजपाकडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली असून त्यांनी यापूर्वी अर्थमंत्री, वनमंत्री अशी पदं संभाळली आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनादेखील यावेळी कॅबिनेट पदाची शपथ देण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहे. विजयकुमार गावीत यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी त्यांचं मराठीत अभिनंदन केले. सलग सहा वेळा आमदार राहिलेल्या गिरीश महाजन यांनादेखील यावेळी कॅबिनेट पदाची शपथ देण्यात आली. महाजन यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

आज करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव मतदारंघातील आमदार गुलाबराव पाटील यांनादेखील संधी देण्यात आली आहे. पाटील यांनी मविआ सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची जबाबदारी संभाळली होती. बंडखोरीनंतर सर्वात पहिला पाठिंबा दिला होता. आजच्या विस्तारात 2004 पासून सलग आमदार असणाऱ्या दादा भुसे यांना कृषी खात्याचा अनुभव असून आज त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 9
  • Today's page views: : 9
  • Total visitors : 505,478
  • Total page views: 532,259
Site Statistics
  • Today's visitors: 9
  • Today's page views: : 9
  • Total visitors : 505,478
  • Total page views: 532,259
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice