राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसा इशारा मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात येलो अलर्ट.

राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसा इशारा मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात येलो अलर्ट.

पुणे दि.6 अॉगस्ट – पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological department) सांगितले असून बीडसह मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
( Heavy rain for the next five days; Yellow alert in Marathwada )

मोसमी पावसाने यंदा चांगलेच मनावर घेतले राज्यात यंदा पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. ज्या तालुक्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही अशा तालुक्यांतही पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा (Marathwada) आणि दक्षिण महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस असेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या पाच दिवसांत आतापर्यंत जिथे सर्वाधिक पाऊस झाला आहे, अशा ठिकाणीही अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करत नदी काठच्या भागाला इशारा दिला आहे.

येथे येलो अलर्ट (Yellow alert)
रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर (Latur), उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
ऑरेंज अलर्ट (Orange alert)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

<

Related posts

Leave a Comment