फडणवीसांचा आक्रोश, सत्ता नसल्याने होत आहे तिळपापड – पुरूषोत्तम खेडेकर

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी रयतेला उद्देशून ऑनलाईन भाषण केले होते . त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला अडचणीत टाकण्यापेक्षा काही मध्यममार्ग सुचवला होता . जो सध्या अंमलात आणला आहे .. महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वप्रथम १६ मार्च २०२० रोजी लॉक डाऊन ऐवजी काही कडक निर्बंध लागू केले होते . त्या काळात जवळपास सर्वच व्यवहार अंशतः चालू राहतील अशी काळजी घेतली होती . त्यामुळे जनतेला सोयीचे गेले. परंतू नंतर २४ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कडक लॉक डाऊन जाहीर केला होता . त्यामुळेच सर्व देशभरात हाहाकार उडाला होता असे दिसते …. यावेळी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वाधिकार राज्यांना दिले आहेत . महाराष्ट्रातील कोरोना महामारी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही मध्यममार्ग सुचवला होता व अंमलात आणला आहे . कडकडीत बंद न करता जवळपास सर्वच व्यवहार मर्यादित स्वरूपात ठराविक वेळात चालू ठेवून जनतेला अडचणीत न आणता कडक निर्बंध घातले आहेत . या मध्यममार्गी आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील व्यवहार सुरू आहेत . यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत आहे असे सर्व निरिक्षणातून लक्षात आले आहे . एवढेच नाही तर इतर राज्यांच्या सरकारांना ही भूमिका पसंत पडली आहे . कोरोना लॉक डाऊन काळात सर्वसामान्य माणसाला अल्प प्रमाणात का होईना महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे. देशात हे प्रथमच घडले आहे. परदेशातील अनेक संस्थांनी याचे कौतुक व अभिनंदन केले आहे ..अगदी केंद्र सरकारने सुध्दा . अर्थात महाराष्ट्र राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मात्र याबाबतीत वेगळाच सूर आहे .
++ याच भाषणातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर विनंती केली होती . ती अशी की…..
(१) महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजनची कमतरता कमी अथवा दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष्य घालावे. आणि दूरवरून होणारी ऑक्सिजनची रस्ते वाहतूक व्यवस्था बदलावी . रेल्वेच्या विशेष गाड्यांची व्यवस्था करून प्राणवायू वाहतूक केली तर जलदगतीने वाहतूक सुरळीत होईल ….. ही मागणी मान्य झाली आहे .
(२) तसेच रेल्वेच्या व्यतिरिक्त संरक्षण विभागाच्या मालवाहू विशेष विमानांनी ऑक्सिजन वाहतूक करणे गरजेचे आहे असे सूचविले होते …… ही मागणी सुध्दा मान्य केली आहे.
(३) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत आहे . त्यामुळे अठरा वर्षे पूर्ण झाली अशा सर्वच नागरिकांना लस दिली पाहिजेत असे सूचविले होते ….. ही सूचना देखील मान्य झाली आहे ..
(४) रेमेडिसेविर व लस तुटवडा निर्माण झाला आहे . तो दूर करण्यासाठी केंद्रीय पातळीवर व्यवहारिक उपाययोजना करणे गरजेचे आहे . वाटप योग्य प्रमाणात झाले पाहिजेत … याबाबत केंद्र सरकारने धोरणात्मक बदल केले आहेत. म्हणजेच मागणी मान्य झाली आहे .

  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे भाषण संपताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन भिकारचोट भाषण अशी संघी टिका केली होती . तसेच सर्वच संघी मिडियाने ते प्रसारित केले होते …..
    ++ पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीसह सर्व सूचनांचे अगदी तिसऱ्या दिवशीच स्वागत केले होते . सर्व सूचनांची गंभीरपणे दखल घेतली होती. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या सर्व सूचनांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंमलबजावणी केली आहे .. रेल्वेच्या व विमानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या परिसरात ऑक्सिजन पुरवठा चालू केला आहे . रेमेडिसेविर इंजेक्शन व लस पुरवठा योग्य होण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत .. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना लस देण्यासाठी निर्णय घेतला आहे …
  • मित्रांनो, यावरून एवढेच स्पष्ट होते की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या विषयांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गंभीरपणे दखल घेऊन कारवाई केली आहे … तर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा कृतीतून त्यांनी निषेध केला आहे … असे म्हणता येईल.

देवेंद्र फडणवीस यांची अशी भूमिका आहे की जर कोणी नागरिक केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करत असेल तर ते राष्ट्रद्रोही मानले पाहिजेत व त्यांनी पाकीस्तानात निघून गेले पाहिजेत …. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना खूष करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ही लाचारी भूमिका योग्य नसल्याचे स्पष्ट होते.. त्यामुळेच त्यांचे उध्दव ठाकरे सरकार पाडण्याचे मनसुबे २०२४ पर्यंत तरी मनांतच राहतील अशी भविष्यवाणी केली जाते…. देवेंद्र फडणवीस यांचे हेच सूत्र जर महाराष्ट्र राज्याला लागू केले तर ….. सतत महाराष्ट्र राज्याच्या विरोधात उभे असणारांना किमान महाराष्ट्र राज्य सोडून जायला हवे आहे… असे म्हणायला हरकत नाही !!!????
— अठराव्या शतकातील फडणवीसांचा सत्तेसाठी हपापलेला व माजवलेला हाहाकार व इतिहास आठवतो का ?? इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे काय ??? याबाबत चिकित्सक मंडळींनी चिकित्सा करावी अशी विनंती आहे ..

++ पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
दिनांक.. २९ एप्रिल २०२१ .

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice