Bapusaheb Gorthekar : माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार

Bapusaheb Gorthekar : माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना नांदेड (Nanded Politics) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भोकर (Bhokar, Nanded) विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.25 ऑगस्ट, गुरुवार) दुपारी 4 वाजता गोरठा, ता. उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील

भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. आपल्या मतदारसंघावरदेखील त्यांची चांगलीच पकड होती. त्यामुळे भोकर तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्यासह जिल्ह्याचंही प्रचंड मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.  उमरी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी गोरठा येथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर गोरठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील निष्कलंक, निस्वार्थी, धाडसी व्यक्तिमत्व, एक संघर्षयोद्धा, चारित्र्यवान, दिलेल्या शब्दाला जगणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पदे यशस्वीपणे निभावलेला एक आदर्श नेता म्हणून त्यांची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेडमध्ये मोठं करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. मधल्या काळात ते काही काळ भाजपताही होतं. मात्र नंतर त्यांची पुन्हा एकदा घरवापसीही झाली होती.

राजकीय प्रवास

बापूसाहेब गोरठेकर यांचे वडील बाबासाहेब गोरठेकर हे देखील राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बापूसाहेब यांनीही राष्ट्रावादीचा वसा घेतला. भोकर विधानसभा लढता लढता नायगाव विधानसभा निवडणूक लढवली त्या ठिकाणी मात्र त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेथे ते रमले नाहीत पुन्हा परत आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घरवापसी केली. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असून उमरी, भोकर तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

<

Related posts

Leave a Comment