शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार

शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार

Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray Supreme Court

मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून आता पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून या घटनापीठावर कोणत्या न्यायमुर्तींची नेमणूक केली जाणार आहे याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray Supreme Court

दरम्यान, कोर्टाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात निर्णय देऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता घटनापीठाच्या निर्णयानंतर पुढील निकाल लागणार असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेना पक्षाच्या आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सध्यातरी पक्ष आणि चिन्हबाबत कोणताही निर्णय होणार नसून आता पाच सदस्यीच घटनापीठाने लवकर निर्णय देण्याची मागणी केली जात आहे.

या मुद्दयांवर असणार लक्ष

सुप्रीम कोर्टातील आजची राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली असून यामध्ये खालील मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे.

  • आमदार, खासदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधिमंडळ/ संसदेकडे आहे का?
  • पक्षाचे चिन्ह, नाव संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जाणार का ?
  • गटनेते पद राजकीय पक्ष ठरवणार की विधिमंडळ पक्ष यांसह मविआने राज्यपालांकडे दिलेली 12 आमदारांची यादी योग्य की अयोग्य?
  • पक्षविरोधी कारवाया म्हणजे स्वतः मर्जीने पक्ष सोडणे म्हणता येईल का?
  • आदी मुद्यांसह व्हीप बजावण्याचे अधिकार कोणाला?
  • नवीन गट तयार न करणे किंवा पक्ष विलीन करण्याचे पर्याय शिंदे समोर आहेत का?

हे ही वाचा ————-

<

Related posts

Leave a Comment