Online Team: विनापरवानगी कोरोनाबाधितांवर (corona patients) उपचार.रेमडेसिव्हीरचा काळाबाजार (Remdesivir). रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत आहे. याच निराशेच्या वातावरणात आशेचे किरणही निर्माण होतात. डॉक्टरातील ”देवमाणूस” अद्यापही जागा आहे, असा सुखद धक्का देतात. त्यातील एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे.(Doctor Chetan Khutemate) पैशासाठी मृतदेहांनाही कुलूप बंद करणाèया डॉक्टरांच्या गर्दी डॉ. खुटेमाटेंनी वेगळा आदर्श समोर ठेवला. (Doctor in Chandrapur not taking fees from relatives of dead corona patients)
त्यांच्या रुग्णालयात दगावलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाइकांना उपचाराची पूर्ण रक्कम परत केली. ही पहिलीच वेळ नाही, नेत्रतज्ज्ञ असलेले खुटेमाटे अनेक गरजवंताच्या शस्त्रक्रिया एक पैसाही न घेता नेहमीच करून देतात.
डॉ. चेतन खुटेमाटे शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:च्या नेत्र रुग्णालयाला चक्क कोविड हॉस्पिटल बनविले. डॉ. सचिन धगडी हे येथे सेवा देत आहेत. कोरोना रुग्ण बरा झाला किंवा मृत झाला, तरी रुग्णालयाचे बिल घेतलेच जाते. नातेवाईकही आप्त गेल्याचे दु:ख पचवत दवाखान्याचे बिल देत असतात. परंतु, काही डॉक्टर याला अपवाद ठरतात. त्यापैकी एक म्हणजे डॉ. चेतन खुटेमाटे आहेत. आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या छोटा नागपूर येथील एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती डॉ. खुटेमाटेंच्या कानावर आली.
सामाजिक पिंड असलेल्या डॉ. खुटेमाटे यांनी कोणताही विचार न करता त्या रुग्णाचे संपूर्ण उपचाराचा खर्च माफ केला. एवढेच नाही, तर भरतीपूर्व घेतलेली रक्कमही नातेवाइकांना परत केली. डॉ. खुटेमाटेंच्या या निर्णयाला त्यांचे सहकारी डॉ. सचिन धगडी यांनीही क्षणात होकार दिला. डॉक्टर यांच्या या कृतीपुढे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांसमोर केवळ हात जोडण्याव्यतिरिक्त काहीच नव्हते.
या प्रसंगाने रुग्णालयातील अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी डॉ. खुटेमाटे यांच्या मनातील तळमळ, गोरगरीबांविषयीची असलेली आस्था जवळून बघता आली. डॉ. चेतन खुटेमाटे यांच्याप्रमाणेच शहरातील अन्य डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. या संकटकाळात सर्वांनी सेवाभावी भाव दाखवावा. जेणेकरून डॉक्टरांविषयीचे तयार झालेले गैरसमज दूर होऊन पुन्हा डॉक्टर हेच देवदूत आहेत, हे कुणीही नाकारू शकणार नाही, एवढे मात्र निश्चित!