महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. अशातच 10वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. Biggest news regarding Maharashtra State SSC 10th Board Exam Result
मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल येत्या आठवड्यतच जारी केला जाईल असं समजत.दहावीचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन चेक करता येणार आहे. Biggest news regarding Maharashtra State SSC 10th Board Exam Result
निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. SMS वर कसा करायचा निकाल चेक? Biggest news regarding Maharashtra State SSC 10th Board Exam Result
तुमच्या मोबाईल फोनवर मेसेजिंग अॅप उघडा. एक नवीन संदेश तयार करा. प्रकार: MHSSC [स्पेस] रोल नंबर 57766 वर मेसेज पाठवा. काही सेकंद थांबा. तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर तुमच्या महाराष्ट्र SSC निकाल 2023 सह एसएमएस येईल. Biggest news regarding Maharashtra State SSC 10th Board Exam Result