महाराष्ट्रात पून्हा अवकाळी पावसाचे संकट; या ठिकाणी पाऊस पडण्याचे संकेत

महाराष्ट्रात पून्हा अवकाळी पावसाचे संकट; या ठिकाणी पाऊस पडण्याचे संकेत

Unseasonal rain crisis in Maharashtra again; Indications of rain at this place untimely-rain

राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. राज्यात कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण झाले आहे. अशातच, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 12 ते 15 मार्च दरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाने untimely-rain गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता १३ ते १७ मार्च दरम्यान पून्हा अवकाळी (Rain) पावसाचे संकट उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडणार (rAIN News) असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे. (Letest Marathi News) Unseasonal rain crisis in Maharashtra again; Indications of rain at this place

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकरी वर्गाची चिंता पुन्हा वाढणार आहे. पावसाची शक्यता असल्यामुळे हरभरा, गहू आणि इतर रब्बी पिके पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. untimely-rain

मागील काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सध्या पश्‍चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

श्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आली आहे. untimely-rain

दोन दिवसांपूर्वी पुण्यासह ग्रामीण भागात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे देखील होते. दोन दिवसापासून संध्याकाळच्यावेळी पुण्यात ढगाळ वातावरण होत आहे.

<

Related posts

Leave a Comment