नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी समग्र शिक्षा 2.0 ला मंजुरी दिली. समग्र शिक्षासाठी किंमत 2.94 लाख कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलीय. ही योजना 2021 पासून मार्च 2026 पर्यंत लागू असेल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समग्र शिक्षा 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा 2.0 वर 2.94 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. 2.94 लाख रुपयांमध्ये केंद्राचा हिस्सा 1.85 लाख कोटी रुपये असेल. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
समग्र शिक्षाच्या दुसऱ्या टप्प्यात 11.6 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा, 15.6 कोटी मुले आणि 57 लाख शिक्षक कक्षेत येतील. समग्र शिक्षाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील काही वर्षांमध्ये, बाल वाटिका, स्मार्ट वर्गखोल्या, प्रशिक्षित शिक्षकांची टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये व्यवस्था केली जाईल आणि पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आणि सर्जनशील शिकवण्याच्या पद्धती विकसित केल्या जातील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
समग्र शिक्षाच्या विस्तारामध्ये शाळांमध्ये सर्वसमावेशक आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये एक भाग म्हणून वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांच्या विकासासाठी लक्ष देण्यात येईल. शिक्षण मंत्री म्हणाले की, या अंतर्गत टप्प्याटप्प्याने प्ले स्कूल उभारण्याबरोबरच शैक्षणिकसाहित्य तयार केले जाईल, तसेच स्मार्ट वर्गखोल्यांचीही व्यवस्था केली जाईल. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
समग्र शिक्षाची व्याप्ती वाढविताना, विशेष सहाय्याची गरज असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र मानधनाची तरतूद, शिकण्याच्या प्रक्रियेवर देखरेख, शिक्षकांची क्षमता वाढवणे आणि प्रशिक्षण कार्य यावर विशेष लक्ष दिले जाईल, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. समग्र शिक्षा अंतर्गत कस्तुरबा गांधी कन्या शाळांची व्याप्ती आणि श्रेणीसुधारणे आणि ‘सर्व’ रिपोर्ट कार्डची प्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत समग्र शिक्षाला मुदतवाढ देण्यात येत असल्याचं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. Union Cabinet decisions samagra shiksha mission extended till 2026
====================================================================================================
- खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुकमुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’…
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे…
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.…
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवारबीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित…
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटकबीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी आणखी…