Udayanraje Sambhajiraje Meet On Maratha Reservation | सर्व राज्यकर्ते जबाबदार, समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?
Online Team | राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल करतानाच कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही, असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. (i don’t believe on court matters, udayanraje bhosale on maratha reservation issue)
उच्च-निच्च ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्याला 70 वर्षे झाली. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थितीत काही फरक आहे की नाही? मग त्यात अमेंडमेंट्स दुरुस्ती केल्या पाहिजेत. लोकांना एकत्र ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. अन्यथा देशाचे तुकडे होतील. लोकशाहीतील राजांना हे कळत नसेल तर दुर्दैव. मतदारांनी त्यांना जाब विचारायला हवा, असं ते म्हणाले.
23 मार्च 1994 ला जीआर काढून आरक्षण देता, ते रद्द करु नका. मग जीआर काढून मराठ्यांनाही आरक्षण द्या. आम्ही जातपात पाहिली नाही. पण आज जाणवत आहे, बोलताना मित्र अंतर ठेवत आहेत. ही दुफळी राज्यकर्त्यांनी निर्माण केली. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर समाजाशाठी एकत्र यावं. संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. द्यायचं असतं तर मागेच दिलं असतं, यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले.
मराठा आरक्षण प्रकरणी आज दोन पर्याय आहेत. एक, रिव्हू्व्ह याचिका करणे. रिव्हू्व्ह याचिका टिकली नाही, तर क्युरेटिव्ह याचिका दाखल करावी लागेल. पण, भोसले समितीनुसार क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे 338-b च्या माध्यमातून वेगळा आयोग तयार करावा लागले. त्यानंतर हा विषय राज्यपालांकडे जाईल. त्या ठिकाणी मागासवर्ग सिद्ध करावे लागेल. त्यानंतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे हा विषय पाठवतील. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर 342-a च्या माध्यमातून ते केंद्रीय मागासवर्गाकडे हा विषय पाठवतील. त्यानंतर केंद्रीय मागासवर्ग राज्य मागासवर्गाकडून सगळा डेटा मिळवेल. त्यानंतर राष्ट्रपतींना वाटल्यास हा विषय संसदेत घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे सर्व राजकर्त्यांनी ठरवायचंय की कोणता पर्याय घ्यायचाय आणि कोणत्या पद्धतीने पुढे जायचंय, असं संभाजीराजे म्हणाले.
राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) द्यायचंच नाही. त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?
हे ही वाचा
- “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”“The Paratwada Horror: 350 Explicit Videos Found as SIT Probes Ayan Ahmed’s Massive Blackmail Racket.” परतवाडा (अमरावती): अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षासोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद केवळ एका गावातील घटना नाही, तर
- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावरमुंबई, ८ एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या न्याय्य मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) भरती २०२६ साठी अधिकृत
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे

