राळेगणसिद्धी येथे 5 जून जागतिक पर्यावरण दिननिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन – राज्याध्यक्ष प्रमोद मोरे
माहूर प्रतिनिधी (ज्ञानेश्वर कऱ्हाळे) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. State-level workshop organized at Ralegansiddhi on the occasion of World Environment Day on June 5 राळेगणसिद्धी येथे 5 जून जागतिक पर्यावरण दिननिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन – राज्याध्यक्ष प्रमोद मोरे
या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे प्रमुख पाहुणे पद्मश्री मा.चैत्राम जी पवार सदस्य, वन्यजीव विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यशाळेसाठी मा.चंद्रकांत शिंदे साहेब, मा. राजू लाकूड झोडे साहेब, मा.ॲड.सुरेश लगड साहेब, मा. राज देशमुख साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व मान्यवर पर्यावरण प्रेमींना या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यावरण प्रेमी उपस्थित राहणार आहेत तरी आपणही या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यशाळेतील विचारांची जनजागृती समाजामध्ये व आपण काम करीत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात करावी व आपली नाव नोंदणी 31 मे 2025 पर्यंत करावी असे आव्हान निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री प्रमोद( दादा) मोरे ,राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क मोबाईल नंबर 8999533683