पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण करणे आवश्यक आहे – पद्मश्री चैत्रम पवार
अण्णा हजारे यांच्यासोबत राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा आणि वृक्षारोपण आयोजित |State-level environmental workshop, tree plantation held at Ralegan Siddhi with Anna Hazare
माहूर प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर कऱ्हाळे.
राळेगण सिद्धी येथून पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, पुनर्निर्माण केले तरच पर्यावरण टिकेल अन्यथा आपल्याला गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील, २००६ चा कायदा प्रभावीपणे अंमलात आणणे गरजेचे आहे.धुळे जिल्ह्यात विविध प्रयोग करून ४८५ बांध विशिष्ट पद्धतीने बांधले, चाराबंदी, कुराडबंदी करून ७०० हून अधिक चेकडॅम तयार करण्याचे काम केले अनेक हेक्टर परिसराचे संरक्षण भारीपाडा येथे करून आदिवासी समूहाला स्वयंपूर्ण बनवण्याला प्राधान्य दिले तसेच यासाठी संघटन करणे गरजेचे आहे संघटन झाले तरच विकास होतो पर्यावरण संवर्धन होते पुनर्निर्मन होते व त्याचे संरक्षण होते असे प्रतिपादन आय.एफ.ए.डी.चे दोन पुरस्कार प्राप्त तसेच विविध पर्यावरणाचे १२ पुरस्कार प्राप्त भारत सरकारचा बहुमोल पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. It is necessary to protect, conserve and restore the environment. State-level environmental workshop, tree plantation held at Ralegan Siddhi with Anna Hazare
आगामी काळात संपूर्ण राज्यात अतिशय झपाट्याने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे काम चालू राहणार आहे मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन विविध पानवठे, पशुपक्ष्यांसाठी मुठभर धान्य घोटभर पाणी, पर्यावरण संमेलन, पर्यावरण कार्यशाळा संपूर्ण राज्यभर पर्यावरणाच्या विविध शाखांचे उद्घाटन आयोजित केले जाणार आहे संपूर्ण राज्यात पर्यावरण संतुलनाचे काम सर्वच पर्यावरण स्नेहींच्या मदतीने व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांच्या सहकार्याने केले जाणार आहे असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत व्यक्त केले.
राळेगणसिद्धी येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी मंडळाचे मार्गदर्शक जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व वन्यजीव विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य, पद्मश्री चैत्राम पवार,उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर,विशेष सरकारी वकील सुरेश लगड, मंडळाच्या सचिव वनश्री मोरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे,प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर, छायाताई रजपूत, तुकाराम अडसूळ,अमोल चंदनशिवे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण उत्साहात पार पाडले.
मोठ्या संख्येने मान्यवरांच्या उपस्थित कार्यशाळा संपन्न झाली यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नांदेड जिल्हा प्रमुख सारनाथ लोणे, यवतमाळ जिल्हाप्रमुख अविनाश रोकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अगस्ती महाविद्यालय अकोले येथील महेश पाडेकर व एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव येथील अमोल चंदनशिवे यांना राज्यस्तरीय आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यशाळेत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणात पर्यावरण विषयाचे महत्त्व कमी केले गेले मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करण्यात आला विद्यार्थ्यांना पर्यावरण व जलसुरक्षा विषयात श्रेणी ऐवजी गुण देण्यात यावे व प्रचलित पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी तसेच यावर्षी होणाऱ्या ९ व्या पर्यावरण संमेलनात तीन दिवसाची कर्तव्य रजा देण्याचा ठराव सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय बारंगळे व नानासाहेब गोफणे यांनी मांडला त्याला अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तुकाराम अडसूळ यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले तसेच ऑक्टोबर महिन्याच्या होणाऱ्या पर्यावरण संमेलनाचे आयोजक जिल्हा नांदेड व यवतमाळ यांनी स्वीकारले त्यांचे नारळ पुणे जिल्हाध्यक्ष मारुती कदम यांनी नांदेड जिल्हा प्रमुख सारनाथ लोणी व यवतमाळ जिल्हाप्रमुख अविनाश रोकडे यांना देण्यात आला.
यावेळी ९ व्या पर्यावरण संमेलन विदर्भ व मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने होणार अशी घोषणा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांनी केले. यानंतर उपस्थित पर्यावरण प्रेमींना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी लतिका पवार, चंद्रकांत भोजने, आनंदा झरेकर, संतोष परदेशी, वैशाली राठोड, वैभव फापाळे, अनिल लोखंडे,विजय बोडके, वैभव मोरे, किसन पिचड, कोमल मोरे,उत्तम पवार, मीनाक्षी मोरे, सरपंच बाळासाहेब ढोले, राजेंद्र आहेर, संजय कारखिले, सुनील कारले, मोहन कवळे, शोभाताई काळे, कल्पना भामरे, पद्मा राजपूत, अशा कांबळे,वर्षा घुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर यांनी तर आभार नानासाहेब गोफने यांनी मानले.