निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने नवव्या राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनासाठी माहुर येथे राज्याध्यक्षाचा पाहणी दौरा…
माहूर :- (प्रतिनिधी) ज्ञानेश्वर कऱ्हाळे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पर्यावरण विषयक विविध उपक्रम पार पाडले जातात , तसेच दरवर्षी पर्यावरण प्रेमींसाठी राज्यात विविध ठिकाणी पर्यावरण सम्मेलन घेतले जातात.आतापर्यंत मंडळाने विविध ठिकाणी आठ सम्मेलन यशस्वी केली असून त्यापैकी एक विदेशात भूतान येथे घेण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने आतापर्यंत राळेगणसिद्धी,चिपळूण,आळंदी (देवाची ), शिर्डी,कोंढापुरी( पुणे),बारामती याबरोबरच विदेशात भूतान येथे अविस्मरणीय संमेलन घेण्यात आले आहे.
यावर्षी होणाऱ्या संमेलनासाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणी मागणी होत आहे त्यामध्ये प्रामुख्याने माहूरगड (नांदेड ), नाशिक,संभाजीनगर येथे मागणी होत आहे.त्यासाठी पाहणी दौरा व क्षेत्र भेट नियोजन करण्यासाठी मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे व इतर समिती सदस्य यांनी नुकतीच माहूरगड येथे भेट दिली त्यांच्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश केदारी,कार्याध्यक्ष संतोष परदेशी,राज्य संघटक प्रा. डॉ.नानासाहेब गोपने हे होते .माहूरगड परिसरात संभाव्य संमेलनासाठी त्यांनी पाहणी दौरा केला.होणाऱ्या संमेलनाच्या दृष्टीने समितीच्या वतीने माहूरगड येथे संमेलन घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे,नांदेड जिल्हा अध्यक्ष सारनाथ लोणे,हिंगोली जिल्हा अध्यक्ष सौ. व श्री रमेश यमलवाड ,पुंडलिक गर्जे,माहुर तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक,पत्रकार,कर्मचारी पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. State-level environmental conference on behalf of the Nature and Social Environment Pollution Prevention Board | निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलन
