मनोरंजन दुनिया मुंबई :- पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. आयटी तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस हे सर्व्हर खंगाळून काढून कुंद्रा यांच्या डर्टी पिक्चरचे काळेधंदे उघड करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ( Shilpa Shetty’s husband Raj Kundra arrested for making porn film )
पोलिसांच्या हाती लागलेल्या या सर्व्हरमधून कुंद्रा यांची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याचे फोनही जप्त केले आहेत. तसेच हे फोन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज कुंद्रा याची पोलखोल करण्यासाठी फोन आणि सर्व्हर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचंही सांगितलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे. ( Raj Kundra arrested for making porn film )
व्हॉट्सअॅप चॅटींग
राज कुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. H नावानं त्याने व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचा तो अॅडमिन होता. या ग्रुपमध्ये केवळ चारच लोक होते. या ग्रुपमध्ये मॉडल्सचे पेमेंट आणि रेव्हेन्यूच्याबाबत चर्चा केली जात होती. आता आणखी नवी माहितीही पोलिसांच्या हाती आली आहे.
यातील एक चॅट 10 नोव्हेंबर 2020मधील आहे. यात एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर करण्यात आलं आहे. पॉर्न कंटेट दाखवणाऱ्या सात ओटीटी प्लॅटफॉर्म्सला समन्स बजावल्याची ही बातमी आहे. या बातमीवर ” Thank God U Planned BF” असं उत्तर देण्यात आलंय. त्यानंतर कुंद्रा यांनी काही दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून बोल्ड कंटेट हटवण्याच्या सूचनाही सहकाऱ्यांना दिल्या. तसेच हॉटशॉट्सला पर्याय निर्माण करण्यासाठी काही तरी मार्ग काढला पाहिजे, असंही त्याने या चॅटमध्ये म्हटलं आहे.
त्यावर एकजण म्हणतो, पोलीस ऑल्ट बालाजीला टेक डाऊन करू शकतील, असा मला संशय आहे. या सहकाऱ्याचा संशय कुंद्रा फेटाळून लावतो. तो म्हणतो, हे एवढं गंभीर नाही. केवळ आक्षेपार्ह कंटेंट त्यांना नको आहे. पण आपलं चांगलं चाललं आहे. Raj Kundra arrested for making porn film
हे ही वाचा ———————–
- राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी…
- भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposedमुंबई । भाजपचे कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी, हा विक्रम आतापर्यंत…
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळलामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथे एका लग्न समारंभाला हजेरी लावली, जिथे त्यांनी…
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का ? जीवन परिचय |Devendra Fadnavis Biographyदेवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आहे ज्यांनी आपल्या वडिलांकडून राजकारणाचा वारसा…
- शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी…