राज्यात अनेक ठिकाणी आभाळ फाटलं, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली शहर गावात पाणी शिरले. प्रशासन सज्ज
न्युज अॉनलाईन टिम (पुणे) :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, मुंबई, पुणे जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तर अनेक गावांत पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अजून चोवीस तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जोरदार पावसाने मुंबई, कोकणातील जनता हवालदिल झाली आहे. मात्र अजूनही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात चार दिवसापासून पाऊस सुरु झाला आहे. खास करुन कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापुर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, नगरमधील अकोले, नाशिकमधील इगतपुरी, घोटी व पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भातील अमरावती, धुळे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने कोकणातील चिपळुन येथे गावांत पाणी शिरले असल्याने एनडीआरएफ च्या टीम दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरातही पंचगंगा नदीने पातळी ओलांडली आहे. नदीकाठ्या लोकांची स्थलांतर केले जात आहे. त्यासाठी एनडीआरएफ च्या दोन टीम येथे दाखल झाल्या आहेत.
राज्यात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 13 ठिकाणी ढगफुटी झाली. आजपर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली. आजवरचा हा उच्चांक असल्याचे हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. जोहरे हे पुणे तेथील आयआयटीएम या हवामान विभागातील मुख्य प्रयोग शाळेतील माजी भौतिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या दाव्यानुसार रडारची संख्या ग्रामीण भागात कमी असल्याने ढगफुटी मोजताच येत नाही. मात्र, 1 मिनिटात 25 मि.मी., अर्ध्या तासांत 50 मि.मी. किंवा एका तासांत 100 मिलीमीटर पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित केले जाते. त्यामुळे राज्यात गुरुवारी 13 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच दिवशी ढगफुटी झाली आहे.
जोहरे यांच्या म्हणण्यानुसार पुणे येथील आयआयटीएम संस्थेतील महासंगणकावर त्यांची मोजणी करता येते. मात्र, राज्यातील मुंबई, पुणे वगळता इतरत्र रडारची संख्या कमी असल्याने ढगफुटीच मोजता येत नाही. ढगफुटी ही लपवली जात आहे. त्याला अतिवृष्टी असे नाव दिले जात आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी 14 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे बजेट आहे. एक रडार 40 कोटीं रुपयांचे आहे.राज्यातील 358 तालुक्यांत वर्षाला एक रडार बसवले. तर, 14 हजार 326 कोटी इतका खर्च येतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यात ढफुटी झाल्यावरच आपत्ती व्यवस्थापनावर मोठा खर्च होतो शिवाय जीवितहानी होते ती वेगळीच. रडार बसवले तर हे टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा ——————————————
- खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुकमुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला…
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे…
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच…
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवारबीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे…
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटकबीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र सीआयडीच्या विशेष तपास पथकाने…