हिंदु वानखेडेचा सत्यनारायण मुस्लिम वानखेडेचा निकाह

हिंदु वानखेडेचा सत्यनारायण मुस्लिम वानखेडेचा निकाह

Sameer Wankhede cast Certificate controversy once again

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. दरम्यान मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.

कबूल है, कबूल है, कबूल है…हा फोटो पोस्ट करतानाच मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोबॉम्ब’ फोडला आहे. त्यांनी वानखेडे यांचा ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

लोफर यांनी पोस्ट केला विवाहाचा दाखला दरम्यान मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील काल वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी हा फोटो पोस्ट कोला आहे.

<

Related posts

Leave a Comment