Rajeev Satav Pass Away | राजीव सातव यांना अखेरचा निरोप, अनेक मान्यवर नेते उपस्थित

Rajeev Satav Pass Away | राजीव सातव यांना अखेरचा निरोप,  अनेक मान्यवर नेते उपस्थित

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचं रविवारी (16 मे) पहाटे निधन झालं. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड या त्यांच्या मुळगावी आज (17 मे) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

22 एप्रिल रोजी राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन दिवसांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटवर ठेवावे लागले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हे ठरले शेवट्चे टिव्व्ट

यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. 10 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.

कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची तब्येत सुधारेल अशी अपेक्षा होती पण त्यांना सायटोमेगॅलो या नवीन विषाणूचा संसर्ग झाला होता अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

राजकीय प्रवास-

काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी पुण्यात फर्गुसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेले आहे. त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव डॉक्‍टर आहेत. 2009 ते 2014 या काळात राजीव सावत हिंगोलीचे आमदार होते. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते 2008 ते 2010 या काळात अध्यक्ष होते. तर 2010 ते 2014 या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. 2014 च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.

<