Rajeev Satav Pass Away | राजीव सातव यांना अखेरचा निरोप, अनेक मान्यवर नेते उपस्थित
काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचं रविवारी (16 मे) पहाटे निधन झालं. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड या त्यांच्या मुळगावी आज (17 मे) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 एप्रिल रोजी राजीव सातव यांची कोरोनाची…