Rajiv Satav Death : काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचं निधन; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी राजीव सातव यांची ओळख होती. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice