Official website facility is available for the darshan entry of Renuka Devi at Mahur https://shrirenukadevi.in guidelines from the administration
नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या बाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सव बाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज माहूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तासमवेत झालेल्या आढावा बैठकीत दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्रिका घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेशिका https://shrirenukadevi.in/ या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या भाविकांना ऑनलाईन प्रक्रीयेत सहभाग घेता येत नाही त्याच्यासाठी टी-पाईट माहूर येथे ऑफलाईन पासेसची सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
नवरात्र काळामध्ये भाविकांच्या सोयीसाठी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यत रेणूका देवी मंदिर खुले राहील. दर्शनासाठी पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. परराज्यातील भाविकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा 72 तासामधील आरटीपीसीआर अथवा 24 तासामधील रॅपीड ॲटीजेन टेस्ट असणे आवश्यक आहे.
या बाबत 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती , गर्भवती महिला व 10 वर्षाखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये दर्शनासाठी गडावर येऊ नये. त्याऐवजी रेणूका देवी संस्थानच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भाविकांना माहूर येथून रेणूका माता मंदिराकडे घेवून जाणे आणि आणण्यासाठी एसटी बसेसची सोय केली आहे.
======================================================================================
- राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?
- भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposed
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का ? जीवन परिचय |Devendra Fadnavis Biography
- शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.