Monsoon Rain Update | पुढील काही दिवस राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Monsoon Rain Update | पुढील काही दिवस राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Lightning, thunder and rain are forecast in the state for the next few days

पुणे : मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) सूरू असतानाच, राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन (Rainfall) झाले आहे. पावसाला पोषक हवामानामुळे (Favorable Weather Condition For Rain) झाल्याने विविध भागात पावसाने हजेरी (Rain Update) लावली आहे. आज (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning and Thunder) हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईतून साधारण ८ ऑक्टोबर आणि महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरला मान्सून परतीचा प्रवास करतो. मात्र यंदा या परतीच्या प्रवासासाठी आणखी काही दिवस उशीर होईल असे अनुमान आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अनुमानानुसार मुंबई आणि कोकणात १० ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी पाऊस असेल. त्यामुळे महाराष्ट्रातून परतीच्या पावसाच्या तारखेचे अनुमान जाहीर करण्यात आलेले नाही.

प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या अनुमानानुसार उत्तर आणि दक्षिण कोकणात शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस असेल. मात्र त्यानंतर त्याची व्याप्ती वाढेल. सोमवार १० ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. या पावसाचा जोर फार नसला तरी पावसामुळे वातावरणात कोरडेपणाही आलेला नसेल. या पार्श्वभूमीवर पावसाच्या परतीच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. त्यामुळे सरासरी तारखेनंतरच पाऊस परतीच्या प्रवासाला सुरुवात करू शकेल.

आंध्र प्रदेश आणि शेजारील भागावर असलेली चक्रीय वातस्थिती सध्या सक्रिय आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून उत्तर प्रदेशचा काही भाग, तेलंगणा, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश येथे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण आहे. तसेच सध्या वाऱ्यांची दिशाही बदलती आहे. पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मेघगर्जनाही होत आहेत. ही द्रोणीय स्थिती आणि तसेच वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलल्याशिवाय वातावरणात कोरडेपणा निर्माण होणार नाही.

परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा शुक्रवारी (ता. ७) कायम होती. तेलंगणा आणि विदर्भ परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वरील प्रणाली पोषक ठरल्यामुळे राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असले तरी उकाडा मात्र वाढला आहे. आज (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता.८) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग) : विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

Read this——-

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice