मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर, शेतकऱ्यांकडून 75,000 रुपये प्रति हेक्टर दराने जमीन भाडेतत्वावर घेणार 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर, शेतकऱ्यांकडून 75,000 रुपये प्रति हेक्टर दराने जमीन भाडेतत्वावर घेणार 
https://youtu.be/WQTmXAgCtRQ

मुंबई : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी जमीन सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणाऱ्या जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75,000 रुपये प्रती हेक्टर असा दर ठरवण्यात आला आहे. 

चार हजार मेगावॅट वीज निर्मीतीसाठी सरकार शेतकऱ्यांची जमीन भाडेपट्ट्यावर घेणार आहे. कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण आणइ महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली असून त्या संबंधित लागणारी जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. 

त्यासाठी 75 हजार रुपये प्रति हेक्टर प्रति वर्षे असा दर ठरवण्यात आला आहे. त्यासाठी प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (Base Rate) तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे. 

https://youtu.be/STw760sOY1Y

हे ही वाचा…..

<

Related posts

Leave a Comment