नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर

पाणचक्की Panchakki संभाजीनगर औरंगाबाद शहरातील इ स 1744 शतका मधील इंजिनिअरिंग चा एक आजूबा |shivprasth

दिल्ली, दि. 2 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या महाराष्ट्रात अंमलबजावणीच्या अनुषंगाने  राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन केले होते. या कार्यदलाच्या शिफारशीच्या आधारावर विविध क्षेत्रांचा सूक्ष्म अभ्यास करून मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी चार उपसमित्या नेमण्यात आल्या होत्या. या उपसमित्यांचा अहवाल केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या कडे सुपूर्द केला. Report of the Committee on Implementation of New National Education Policy submitted to Central Govt

आज दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी  भेट घेऊन उपसमित्यांचा अहवाल सुपूर्द केला.मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या समित्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल तयार केले आहे. Report of the Committee on Implementation of New National Education Policy submitted to Central Govt

या उपसमित्यांमध्ये  चार वर्षांच्या पदवी कार्यक्रमाची रचना आणि दुहेरी अथवा संयुक्त पदवी कार्यक्रम, उच्च शैक्षणिक लिंक योजना (Higher Education Links Scheme ) समूह (क्लस्टर) केंद्रांमध्ये रूपांतर करणे, उच्च शैक्षणिक संस्था (Higher Education institution) मधील शिक्षकांच्या कार्यप्रदर्शनाबाबत मूल्यमापनासाठी मापदंडांची शिफारस यासह एकूण धोरण ठरविणे. अशा या चार उपसमित्यांचा अहवाल आज केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे सोपविण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice