निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अहमदनगर येथे पक्षांसाठी मातीची भांडी वाटप

अहमदनगर- उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अहमदनगर येथे नागरिकांना मातीची भांडी नुकतीच वाटप करण्यात आली असल्याचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सांगितले आहे. या भांडी वाटप कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक भैय्या गंधे ,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी सचिन कंद ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अहमदनगरचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे , अहमदनगरच्या हास्य क्लबच्या अध्यक्षा छायाताई बंडगर ,पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे ,सचिव वनश्री मोरे यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्याला व इतर सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धनात पक्षी अतिशय महत्वाचे कार्य करतात.उन्हाळ्यात पक्षांसाठी चारा पाणी मिळणे अवघड होते म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने दरवर्षी पक्षांसाठी घोटभर पाणी मुठभर धान्य हे अभियान संपूर्ण राज्यात राबविले जाते.

वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांनी काढलेली ही संस्था थोर समाजसेवक पद्मभूषण आण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबवित असते असे यावेळी बोलताना या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सांगितले.पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.सर्व सजीवांना चांगले जीवन जगता यावे म्हणून प्रमोद मोरे आणि त्यांच्या पर्यावरण मंडळातील सर्व सदस्य राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहे असे यावेळी प्रमुख पाहुणे बोलताना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले.

आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रमोद मोरे आणि त्यांच्या पर्यावरण मंडळातील सर्व सदस्य राबवित असलेले विविध उपक्रम हे समाजाला व सर्व सजीवांना उपयुक्त आहेत असे यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगरचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले.निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी संचिन कंद यांनी सांगितले. यावेळी अहमदनगर शहरातील नागरिकांना पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण ,पक्षी संवर्धन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली व पक्षांसाठी मातीची भांडी वाटप केली.

मंडळाच्या राज्याच्या कार्याध्यक्षा छायाताई रजपूत यांनी सर्वांचे स्वागत केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे नूतन सचिव कार्यक्रम व नियोजन अनिल लोखंडे यांनी केले.तर मंडळाचे विलास नाबदे यांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी वैभव मोरे ,वनश्री मोरे ,शर्मिला कदम ,शांता ठुबे ,पत्रकार आण्णासाहेब साबळे ,अशोक भोसले , मीनाक्षी जाधव ,स्वाती अहिरे ,उत्तम पवार ,अर्जुन खंडागळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे ,मंडळाच्या छायाताई रजपूत, पर्यावरण मंडळाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ ,पर्यावरण मंडळाचे अनिल लोखंडे ,पोपट पवार ,प्रकाश केदारी ,सुभाष कोंडेकर यांनी परिश्रम घेतले.या सामाजिक उपक्रमाबद्दल समाजातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice