Corona |आज पासून नवे निर्बंध, नवे नियम तिसरा टप्पातील सुचना, तिसरी लाटेचे संकते

Corona |आज पासून नवे निर्बंध, नवे नियम तिसरा टप्पातील सुचना, तिसरी लाटेचे संकते

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9 हजार 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 8 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केलीय. 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 30 हजार 527 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi 27 June 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus Corona variant Unlock Updates

आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वर ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार 5 गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती.
‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात निर्बंध लागणार नाहीत – राजेश टोपे
‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे रुग्ण आढळलेलं विचखेडा गाव कोरोनामुक्त कसं झालं?
चीनमध्ये कोरोनाचा पहिला संसर्ग कधी झाला? ब्रिटनच्या संशोधकांनी दिली माहिती
कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट काळजीचं कारण असल्याचं सरकारनं या नव्या आदेशात नमूद केलंय.
सरकारनं म्हटलंय,
या नव्या व्हेरियंटची प्रसार करण्याची क्षमता अधिक आहे.
त्यांचा फुप्फुसावर अधिक परिणाम होतोय.
या व्हायरसमुळे मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात घट होतेय.
नवीन आदेशानुसार, आर-टीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून मिळालेल्या आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर पाहून निर्बंध किती वाढवायचे याचा विचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

तसंच, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली असले तिथे थेट निर्बंध वाढवण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावेत यासाठी त्यांनी राज्य प्रशासनाच्या आदेशांची वाट पाहू नये, असंही म्हटलं आहे.
जिल्हा स्तरावर सूचना
आज जारी करण्यात आलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात यावी, यासाठी जनजागृती करावी.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी कार्यालयांच्या ठिकाणी हवेशीर वातावरण ठेवावं.
मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या RT-PCR चाचण्या करणे.
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंड आकारणे.
गर्दी होईल असे कार्यक्रम किंवा घटना टाळणे.
कंटेनमेंट झोन तयार करताना ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याच ठिकाणी निर्बंध लावता येतील, याचा विचार करावा.

<

Related posts

Leave a Comment