कोरोनाची तिसरी लाट येणार असे सांगितले जात आहे. डेल्टा प्लस व्हेरीयंटची बाधा होताना दिसत आहे. त्या पाश्वभूमीवर शासनाने 31 जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध लागू केले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंट अती धोकादायक, जागतीक आरोग्य संघटनेचा इशारा दिला आहे. मात्र भारतात काळजी घेतली तर तीसरी लाट धोकादायक नसेल असे जागतीक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. दरम्याण लोकांनी काळजी घेतली. कोरोनाचे नियम पाळले तर तिसरी लाट फार येईल असे वाटत नाही असे राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी सांगितले आहे.
कोरोनाची बाधा सुरुच आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी डेल्टा प्लस व्हेरिंयटची बाधा आणि येऊ पाहत असलेली तिसरी लाट पाहता राज्य सरकारने पुन्हा 31 जिल्हे व सर्व महापालिंकाचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. त्यात पुणे, नगर, बीड, नांदेड, बुलढाणा, अमरावती, परभणी, गडचिरोली, भंडारा, वर्धा, मुंबई शहर, चंद्रपुर, वाशिम, नाशिक, मुंबई उपनगर, धुळे, यवतमाळ, गोंदिया, हिंगोली, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार, पालघर, जालना, अकोला, सांगली, लातुर, औरंगाबाद, सोलापुर, ठाणे या जिल्ह्याचा समावेश आहे.
नव्या निर्बंधात शनिवार व रविवार अत्यावश्यक नसलेली दुकाने बंद राहणार आहेत. इतर दिवशी सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यतच सुरु राहतील, हाॅटेल, सरकारी व खाजगी कार्यालये, हाॅटल 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. लग्नासाठी 50 लोक तर अंत्यसंस्कार वीस लोक असतील.
डेल्टा प्लस व्हेरियंट हा निष्काळजीपणा झाला तर घातक आहे. मात्र भारतात काळजी घेतली तर तीसरी लाट धोकादायक नसेल. गेल्यावर्षीपेक्षा व या विषाणुची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेच्यावेळीकुटूंबातील एक व्यक्ती बाधित व्हायची. आता कुटूंबातील सगळीच व्यक्ती बाधित होत आहेत. लहान मुलांत किती परिणाम होईल ते सांगता येत नाही. मात्र पहिली व दुसरी लाट पाहता वयोगट कमी झाली. त्याचा विचार करता लहाण मुले बाधित होऊ शकता. लसीचा परिणाम चांगला आहे. व्हायरस जेव्हा स्वतःचे स्वरुप बदलतो. तेव्हा तो किती लोकांना बाधित करतो हे त्यांच्या तिव्रतेतून दिसते. लसीकरण हे त्याला महत्वाचे आहे. सामाजीक आंतर, मास्क सह जबबादाऱ्या पाहूनच तिसरी लाट कधी येईल हे सांगता येईल. लोकांनी जर बेजबाबदारपणा दाखवला तर लाट लवकर येईल. काळजी घेतली तर लाट कमी प्रमाणात येईल असे राज्याचे कोविड टास्कचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.दरम्याण केंद्र सरकारने डेल्टाप्लस विषयी माहिती घेण्यासाठी बैठक घेतली आहे. तीव्र डोकेदुखी, तीव्र ताप, सतत नाक गळणे हे या डेल्टा प्लसची लक्षणे आहेत. देशात 51 रुग्ण असून त्यातील 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत असे सांगण्यात आले.
- शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री…
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefitsबाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध आहे, ज्याचा उपयोग विविध शारीरिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. याच्या…
- Kalmegh Ayurvedic Plant| कलमेघ बहुउद्देशीय आयुर्वेदिक वनस्पतीची ओळख; यकृत, अँटिऑक्सिडेंट, पचनशक्तीभारत हा वनौषधींच्या बाबतीत श्रीमंत देश मानला जातो. कलमेघ, एक बहुमुखी आयुर्वेदिक औषधी वनस्पती; यकृत, अँटिऑक्सिडंट, पचनशक्ती आयुर्वेदिक…
- उन्हाळ्यात हाडांच्या मजबूती साठी हे पदार्थ खा भरपूर कॅल्शियम मिळवागरमीच्या दिवसांत (Summer Health Tips) थंड पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. काही पदार्थांच्या सेवनाने फक्त शरीर थंड…
- Kalmegh | काळमेघ ओळख एका बहुपयोगी आयुर्वेदिक वनस्पतीची ; याकृत, अँटिऑक्सिडेंट, पाचनशक्तीभारत जड़ी-बूटियांच्या बाबतीत एक समृद्ध देश मानला जातो.Kalmegh, a versatile Ayurvedic herb; Liver, antioxidant, digestive power सह्याद्री पर्वत…