रब्बी हंगाम गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना भरण्याचे आवाहन

रब्बी हंगाम गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना भरण्याचे आवाहन

Appeal to pay PM crop insurance scheme for rabi season wheat, sorghum, gram crop

जिमाका दि. 23 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के असा मर्यादीत आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागु आहे.

गहु (बा.) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 38 हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 570.00 आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापुर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हे हदगाव आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 राहिल.

ज्वारी (जि) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 28 हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 420.00 आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव हे आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 राहिल. Appeal to pay PM crop insurance scheme for rabi season wheat, sorghum, gram crop

हरभरा या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 35 हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 525.00 आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी ही आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 राहिल.

ही योजना इफको टोकीयो जनरल इंशुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी 30 नोव्हेबर 2021 असुन गहु बा. व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2021 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. Appeal to pay PM crop insurance scheme for rabi season wheat, sorghum, gram crop

<

Related posts

Leave a Comment