Late today. Official decision to make Marathi the official language in 1966 on the initiative of Vasantrao Naik! Read detailed
आज आपण महाराष्ट्र वर्धापन दिवस अर्थात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. परंतु त्याचबरोबरीने आज मराठी राजभाषा दिन सुद्धा आहे. Marathi rajyabhasha din आजच्या दिवशी कै. वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने 1966 ला मराठीला राज भाषा दर्जा देण्याचा अधिकृत निर्णय ! वाचा सविस्तर (Late today. Official decision to make Marathi the official language in 1966 on the initiative of Vasantrao Naik! Read detailed)

आपल्या महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. परंतु महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठी नव्हती. राज्य स्थापन होऊनही मराठीला राजभाषेचा दर्जा दिला गेला नव्हता. महाराष्ट्राचे कर्तबगार मराठमोळे मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी १ मे १९६६ रोजी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा अधिकृत निर्णय घेत, मराठी भाषेचा जणू राज्यभिषेक करण्यात आला. एवढेच नव्हे तर नाईकसाहेबांनी १ मे रोजी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याच्या या दिवशी केलेले भाषण आणि मांडलेले विचार हे केवळ मराठी साहित्य, भाषा पुरतेच नव्हे तर संपूर्ण मराठी मनाला गौरवणारे असे ऐतिहासिक ठरले. नाईकसाहेबांनी राज्यात सर्वप्रथम शासकिय कामकाज मराठीतून चालण्यासाठी अधिकृत शासन निर्णय तर घेतलेच.परंतु त्याचबरोबर भरिव उपाययोजना म्हणून त्यांनी सर्वप्रथम पुणे येथे भाषा संचालनालयाची स्थापना केली. मराठी भाषेचे संवर्धन व प्रसाराकरीता विभागीय केंद्राची निर्मिती केली. बालभारतीची स्थापना केली.
महानायक वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राची उभारणी करीत असतांना त्यांनी मांडलेले दूरगामी विचार आणि लोकाभिमुख धोरण हे अतिशय प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा अावाकाच इतका प्रशस्त, लोकाभिमुख आणि दूरदर्शी होता कि त्यांना ग्रंथ लिहण्यासाठी वेळच मिळाला नाही. राज्य नवनिर्माण करतांनाचे त्यांचे परिश्रम, संघर्ष आणि धोरणे हे किती महत्वपुर्ण होते याचा आपण विचार करू शकता. तेंव्हाचा काळ आजच्या काळाइतका भौतिकदृष्ट्या व सोयीसुविधायुक्त नव्हता. त्याकाळी आखलेले दूरगामी लोकाभिमुख धोरणे व उपाययोजनांच्या बळावरच आजचा पुरोगामी महाराष्ट्र खंबीरतेने उभा आहे. हे तितकेच वास्तव.
मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिन म्हणून आज खुप मोठे संभ्रम आज दिसून येते. मराठी राजभाषा दिन म्हणजे कोणत्याही व्यक्तिमत्वाची जयंती किंवा पुण्यतिथीला नसुन ते या राज्यांचे प्रत्येक मराठीमनाचे लोकनियुक्त शासन निर्धारित असा राजभाषा दिन (१ मे) आहे. राजभाषा दिनाला राज्याच्या दृष्टीने, राज्याचे स्वाभिमान आणि इतिहासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक स्थान असते. राजभाषा दिन हे भिन्नभिन्न दिवशी असू शकत नाही. २७ फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस राजभाषा दिवस नसतांना देखिल त्यादिवशी तसा उल्लेख करून शुभेच्छा देणे म्हणजे १मे रोजी असलेल्या राजभाषा दिनाचा वर्धापन दिवसाचा खरा हक्क हिरावल्यासारखा नव्हे का? ज्या तारखेला राज्याची स्थापना झाली, मुद्दाम तोच दिवस अर्थात १ मे, नाईकसाहेबांनी निवडला. कारण महाराष्ट्र आणि मराठी ‘शरिर आणि आत्मा’ प्रमाणे एकजीवी आहे.

मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस मराठीसाठी अत्यंत महत्वपुर्ण आहेत, परंतु या दोन्ही दिवसाचे तपशिल आणि संदर्भ मात्र वेगवेगळे आहे. म्हणून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा व्हावा. आधुनिक महाराष्ट्र उभारतांना ज्या थोरपुरूषांनी परिश्रम घेतले. त्या सर्वांना अभिवादन. महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा (Late today. Official decision to make Marathi the official language in 1966 on the initiative of Vasantrao Naik! Read detailed)
============
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहे
- Pahalgam terrorist attack | जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यात 26 पर्याटक ठार, महाराष्ट्रातील सहा जण – वाचा सविस्तर
- क्रिकेट क्षेत्रात खळबळ; लिंग परिवर्तन केलेला आर्यन किंवा अनाया बांगर पुन्हा चर्चेत, लालनटॉप दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप
- प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची प्रशासनातील लुडबुड, सिईओ यांना खटकली ?
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?