Petrol Out Of Control : अबकी बार, पेट्रोल दर महागाईचा हाहाकार

Petrol Out Of Control : अबकी बार, पेट्रोल दर महागाईचा हाहाकार

Online Team

मागच्या काही दिवसांपासून इंधनाचे दर (Fuel prices) गगनाला भिडले आहेत. मुंबईत आज पेट्रोलच्या दराने शतक गाठले. प्रतिलिटर पेट्रोलरचा दर (petrol rate) १०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. महिन्याभरातील पेट्रोलच्या दरातील ही १५ वी वाढ आहे. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात २६ पैसे तर डिझेलच्या दरात २८ पैशांनी वाढ झाली. (Fuel prices touch new highs petrol crosses Rs 100 a litre in Mumbai)

संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीला पोहोचले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरात आधीच प्रतिलिटर पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेलेले असताना, आता मुंबईतही पेट्रोलच्या दराने सेंच्युरी मारली आहे.

मुंबईत आता प्रतिलिटर पेट्रोलचा दर १००.१९ पैसे आणि डिझेलचा दर ९२.१७ पैसे आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या राज्यनिहाय बदलत जातात. वॅट आणि अन्य स्थानिक करानुसार हे दर बदलतात. देशात राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक वॅट कर आकारला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो.

दिल्लीमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर ९३.९४ पैसे आणि डिझेलचा दर ८४.८९ पैसे आहे. चार मे पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली ही १५ वी वाढ आहे. राजस्थानच्या सर गंगाराम जिल्ह्यामध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर सर्वाधिक १०४.९४ पैसे तर डिझेलचा दर ९७.७९ पैसे आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice