महाबीजच्याच धर्तीवर खाजगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे दर ठेवावे.

नांदेड

खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्याच्या दराकडे लक्ष लागून आहे,
दोन दिवसापूर्वीच महाबीजने आपल्या बियाण्याच्या दराचा निर्णय घेत चालू खरीप हंगामासाठी मागच्या वर्षीचे दर कायम ठेवले आहेत,यावर्षी शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात मोठा फटका बसला आहे,कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यावर मोठ आर्थिक संकट आले आहे,या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे या हवालदिल परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम दरवाढ न करून खाजगी कंपन्यांनी द्यावे,मध्यप्रदेश सरकारने सुद्धा परराज्यात सोयाबीन बियाणे विक्रीवरील निर्बंध मागे घेतले आहेत, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे मुबलक मिळणार आहे,सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त मध्यप्रदेशच्या असून या सर्व कंपन्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन दरवाढ करू नये अशी सर्वच कंपन्यांना पत्र देऊन विनंती केली असल्याची माहिती पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

<

Related posts

Leave a Comment