पीकस्पर्धा – खरिपात चांगले दर्जेदार उत्पादन घ्या, अन सरकारचे भरघोष बक्षीसही मिळवा

पीकस्पर्धा – खरिपात चांगले दर्जेदार उत्पादन घ्या, अन सरकारचे भरघोष बक्षीसही मिळवा

पुणे, : आपल्याच शेतात चांगले उत्पादन घ्या अन सरकारच्या कृषी विभागाचे बक्षीसही मिळवा. कृषी खात्याने यावर्षीच्या खरिपासाठी पीकस्पर्धा जाहीर केलीय. त्यात सहभागी व्हायचे असेल तर मुग व उडीदासाठी दि. ३१ जुलै पूर्वी व इतर खरीप पिकांसाठी दि. ३१ ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करावा लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सहभागाची कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी अपेक्षा केली आहे.

शेतकऱयांनी चांगले पीक उत्पादन घ्यावी, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांनी चांगले प्रयोग करावेत आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने यंदा खरिप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजीत केली आहे. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येत आहे.

स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण ११ पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान १० गुंढे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करणार आहेत.

स्पर्धेत सहभागानंतर बक्षीसपात्र शेतकऱ्यांना

त्या-त्या तालुक्यात पीक कापणी प्रयोगासाठी सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. या स्पर्धेतील सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटात प्रत्येकी तीन बक्षीसे दिली जातील. तालुका पातळीवर प्रथम पाच हजार, द्वितीय तीन व तृतीय दोन हजार, जिल्हा पातळीवर प्रथम दहा, द्वितीय सात व तृतीय पाच हजार, विभाग पातळीवर प्रथम २५, द्वितीय २० व तृतीय १५ हजार तसेच राज्य पातळीवर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० व तृतीय ३० हजार रुपये बक्षीस आहे.


हे ही वाचा

<

Related posts

Leave a Comment