टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताला पहिले पदक मिळवून दिले. 49 किलो वजनी गटात मीराबाईने ही दमदार कामगिरी केली. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये एकूण 202 किलो वजन उचलत रौप्यपदकाला गवसणी घातली. स्नॅच राउंडमध्ये मीराबाईने 87 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 115 किलो वजन उचलले. महिलांच्या 49 किलो वजनी गटातील सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेले. (Who is the silver medalist Mirabai Chanu? Know about her)
महिलांच्या वेटलिफ्टिंगची सुरवात स्नॅच राउंडपासून झाली. मीराबाईने पहिल्यांदा 81 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने 87 किलो वजन उचलले. पण तिसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तिसऱ्या वेळी तिला 89 किलो वजन उचलायचे होते, पण ती अयशस्वी ठरली. स्नॅच राउंडमध्ये मीराबाईने दुसरे स्थान पटकावले. चीनच्या वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये 94 किलो वजन उचलत ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला.
मीराबाईने इतिहास रचला
ऑलिम्पिकमधील महिला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकत भारताला दुसरे पदक जिंकून दिले. यापूर्वी 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई ही बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनंतर केवळ दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
या आधी वेटलिफ्टिंगमध्ये कर्णम मल्लेश्वरीने 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. वेटलिफ्टिंगच नव्हे तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. मल्लेश्वरीने स्नॅच राउंडमध्ये 110 तर क्लीन अँड जर्कमध्ये 130 किलो असे एकूण 240 किलो वजन उचलले होते.
कोण आहे मीराबाई? (Who is the silver medalist Mirabai Chanu? Know about her)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारी मीराबाई चानू एकमेव खेळाडू आहे. तिने 49 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. आणि टोकियोमध्ये भारताचे खाते उघडले. यापूर्वीही मीराबाईने अनेकवेळा देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या वेळी ती भारताला पदक मिळवून देईल, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात होती. आणि ती खरी ठरली.
मीराबाईचा जन्म मणिपूरच्या दुर्गम भागातील एका गावात झाला होता. लहानपणापासूनच तिला तिरंदाजीमध्ये करिअर करायचं होतं, पण आठव्या इयत्तेत असताना तिने वेटलिफ्टिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. इम्फाळची वेटलिफ्टर कुंजराणीला पाहून आपणही वेटलिफ्टर व्हावं, अशी इच्छा मीराबाईला झाली.
कुंजराणीलाच केलं पराभूत
2014च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. या प्रकारातील सुवर्णपदकही भारताच्या खात्यात आले होते. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत मीराबाईने तिची आयडॉल असलेल्या कुंजराणीचा पराभव केला आणि ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्के केले.
2017च्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाईने सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला होता. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत तिने भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.
हे ही वाचा ———————————-
- खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुकमुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’ अशा शब्दांत…
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जवळचे…
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ…